स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदरामध्ये कपात केल्यानंतर सर्वच गृहकर्ज
पुरवठादारांनी व्याजदर घटविण्याची तयारी केली आहे. हाउसिंग फायनान्स
कंपन्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करीत
आहेत. व्याजदर कमी करण्यासाठी या कंपन्यांच्या अॅसेट लायबिलिटी समित्यांची
चालू महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सने काही
दिवसांपूर्वीच व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या
माहितीनुसार एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स आणि इंडियाबुल्स हाउसिंगही
व्याजदरात कपात कपात करण्याचा विचार करीत आहेत.
‘स्पर्धकांच्या दबावामुळे गृहकर्ज देणाऱ्या खासगी वित्त कंपन्यांना व्याजदरात घट करणे भाग आहे. व्याजदरात होणारी कपात ही सर्वस्वी कंपन्यांच्या उधारीवर अवलंबून आहे. मोजक्या कंपन्या सोडल्या तर, उर्वरित कंपन्यांना स्वस्तात निधी प्राप्त करणे अवघड आहे,’ असे ‘इक्रा रेटिंग्ज’चे वरिष्ठ उपाध्यक्ष कार्तिक श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर २०१८मध्ये ‘आयएल अँड एफएस’मध्ये गैरप्रकार झाल्यानंतर डेट गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर कर्जे देणाऱ्या कंपन्यांना रोख तरलतेशी सामना करावा लागला होता. या कंपन्यांचे व्याजदर जवळपास एकसारखे असल्याने त्यांच्यात कपातीसाठी स्पर्धा होण्याची दाट शक्यता आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सतर्फे ज्या अर्जांमध्ये महिलेचे नाव असेल त्या अर्जांना कमी दर आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’चे सीएफओ कपीश जैन म्हणाले की, स्पर्धा, किंमत, बाजारातील मागणी आणि उपलब्ध असणाऱ्या सर्व उत्पादने आदी बाह्य घटकांचा विचार करता व्याजदरकपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या कंपनीच्या अॅसेट लायबिलिटी समितीच्या बैठकीत व्याजदर कमी करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात गृहकर्ज वितरित करणाऱ्या कंपन्यांच्या वृद्धिदरात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे त्यांचा बाजारहिस्सा प्राप्त करण्यात बँकांना यश आले आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment