मुंबई : 'राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरण'ने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री
यांना पुन्हा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नेमण्याचे आदेश दिले. या निर्णयाला
टाटा सन्सकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या निमित्ताने
पुन्हा एकदा टाटा आणि मिस्त्री आमने सामने येणार आहेत. आता सर्वोच्च
न्यायालय काय निर्णय देणार याकडे काॅर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे.
सायरस मिस्त्रींची परतीची वाट अवघडच
'एनसीएलएटी'ने या महिन्याच्या सुरुवातीला एन.चंद्रशेखरन यांची टाटा
सन्सच्या चेअरमनपदाची नियुक्तीही बेकायदा ठरवली होती. आपल्या निर्णयात
'एनसीएलएटी'ने सायरस मिस्त्री यांची पुन्हा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी
नियुक्ती करावी असे आदेश होते. चार आठवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी होणार
आहे, मात्र तत्पूर्वीच टाटा समूहाकडून अपेक्षेप्रमाणे 'एनसीएलएटी'च्या
निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.तयामुळे यावर सर्वोच्च
न्यायालयाने जर टाटा सन्स यांच्या बाजूने निकाल लागला तर एन. चंद्रशेखरन
अध्यक्षपदी कायम राहतील.
सायरस मिस्त्रींची परतीची वाट अवघडच
0 comments:
Post a Comment
Please add comment