नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये शुल्कवाढीनंतर टेलिकॉम कंपन्या
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन आणि चांगला फायदा देणारे प्लान घेऊन
येत आहेत. प्रीपेड प्लान महाग झाले असल्याने आपले ग्राहक कमी होऊ नयेत असा
कंपन्याचा प्रयत्न असतो. हे लक्षात घेत एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी २७९
आणि ३७९ रुपयांचे दोन नवीन प्रीपेड प्लान बाजारात आणले आहेत. या
प्लानद्वारे ग्राहकांना कोणते फायदे दिले जात आहेत, हे पाहुया...
पहिला दिवस भारताचा, ६७,३८५ बाळांचा जन्म एअरटेलच्या ३७९ रुपयांच्या योजनेत लाभ एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची व्हॅलिडिटी
देण्यात येत आहे. या प्लानला एफओपीची मर्यादा देण्यात आलेली नाही. आणि आता
कोणत्याही नेटवर्कसाठी ट्रू अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत आहे. संपूर्ण
व्हॅलिडीटी कालावधीसाठी या प्लानमध्ये एकूण ९०० विनामूल्य एसएमएस देण्यात
आले आहेत. हा प्लान सबस्क्राइब करणाऱ्या ग्राहकाला कंपनी विंक म्युझिक, एअरटेल एक्सट्रीम अॅपची फ्री सबस्क्रिप्शन आणि फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपये कॅशबॅक असे अनेक फ्री बेनिफिट्स देत आहे.
About
Gosip4U
Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.
0 comments:
Post a Comment
Please add comment