फर्गुसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.
भावी पिढीसाठी एका शैक्षणिक मंदिराचा शिलान्यास उभा केला.
चतुरशृंगीच्या माळावर एक रोपटे लावले. त्या रोपट्याचे रूपांतर आज एक
महाकाय वटवृक्षात झाले आहे. आज त्या वटवृक्षाच्या आयुष्याला तब्बल 135
वर्षे पूर्ण झाली. याच वटवृक्षाच्या छायेत असंख्य अगणित विद्वत जणांनी
विसावा घेतला. आयुष्य उजळणारी चेतना घेतली. शतजन्म धन्य करणारी ऊर्जा
घेतली. विविध जीवनक्षेत्रे गाजवणारी राजविद्या ग्रहण केली. खरे तर या भूमीत
कल्पवृक्षाची एक बाग आहे, त्या बागेत सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात.
ज्याला फर्ग्युसनचा स्पर्श झाला, त्याचा जन्म सफल झाला. त्याला जन्म
मृत्युचे भय कसले ? तो इहलोकी सुखी आणि परलोकीही सुखी होतो. असे आमचे ठाम
मत आहे. असो.
फर्ग्युसन शब्दाचा अर्थ आहे,
परमात्म्याचा पुत्र. म्हणून या महाविद्यालयाला फर्ग्युसन हे मिळाले.
जेम्स फर्ग्युसन मुंबईचे गव्हर्नर जनरल होते. ते लोकमान्य टिळकांचे मित्र
होते म्हणून या महाविद्यालयाला फर्ग्युसन हे नाव लाभले. अशी अनेक कारणे
आहेत. पण खरी गंमत अशी आहे,लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्ता उध्वस्त
करण्यासाठी या महाविद्यालयाला एका ब्रिटिशाचे नाव दिले . ही लोकमान्यांची
रणनीती होती, ती त्यांची दूरदृष्टी होती. फर्ग्युसनच्या पावन स्मृतीस
विनम्र अभिवादन!!
0 comments:
Post a Comment
Please add comment