वॉशिग्टन: अमेरिकेतील विमान कंपन्यांनी आपली विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना अमेरिकेच्या फेडरल अव्हिएशन अडमिनिस्ट्रेशनने (एफएए) जारी केल्या आहेत. अमेरिकी विमानांवर पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवादी हल्ला होऊशकतो, अशी माहिती अमेरिकेच्या हाती आली आहे.त्यानंतर अमेरिकेच्या हवाई प्रशासनाने ही सूचना दिली आहे. दरम्यान अमेरिकेने ईराणच्या बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला केला. यात ईराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हल्ल्यात मारला गेला आहे. शिवाय, पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस हा देखील मारला गेल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, अमेरिकेला दहशतवाद्यांकडून अमेरिकी विमानांना लक्ष्य केले जाण्याबाबत माहिती मिळल्यानंतर अमेरिकेने बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ल्या केला. यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ईराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हा अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. या हल्ल्यात ईराणचे समर्थन असलेला पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस हा देखील मारला गेल्याचे वृत्त आहे.
बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. ईराण आणि अमेरिका यांच्या दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. इराकमधील दूतावासाची तोडफोड झाल्यानंतर काही सेकंदात अमेरिकेने त्या ठिकाणी लष्कर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

0 comments:
Post a Comment
Please add comment