असा सुचला 'गली बॉय'मधील 'तो' डायलॉग

 झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाने 2019 हे वर्ष गाजवले. थेट ऑस्करच्या शर्यतीपर्यंत मजल मारणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

 त्यातीलच एक कारण म्हणजे या चित्रपटातील संवाद आहे. यामध्ये मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचीच जास्त झलक असल्याचे विजय मौर्य यांनी सांगितले.

कुठेही जा मानखुर्द, कन्नमवार नगर, करिरोड, कॉटनग्रीन, मालवणी अशा ठिकाणी गेलं असता तिथे अनेक शब्दांचे बारकावे नेमके कसे आहेत, हे निदर्शनास येतात.

 'क्या कर रेले है भावा...' ही अशी भाषा दिग्दर्शिका झोया अख्तरला हवी होती. सर्वजण बोलतात त्याच भाषेचा वापर करण्यावरस तिचा जोर होता. त्याच धर्तीवर 'गली बॉय'मधील संवाद लिहिले गेले.

 रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेला डायलॉग 'मेरे बॉयफ्रेंड गुलूगुलू करेगी तो धोपटूंगीही ना' हा आहे.

 असा सुचला डायलॉग : 'धोपटूंगी हा तर मराठी शब्द. आता मुळात हा चित्रपट धारावीमध्ये घडला. इथे विविध भाषा, प्रांताची लोकं राहतात. आलियाने साकारलेल्या सफीनावर विविध भाषा ऐकून तिच्यावर प्रभाव झाला. त्याच आधारे धोपटूंगीना या शब्दाचा वापर डायलॉगमध्ये करण्यात आला.






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment