शिवसेना-भाजप युती तुटल्यावर सेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस
व काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकासआघाडी सरकार स्थापन केले व उद्धव
ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
मात्र
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या
भिंतीवर वादग्रस्त मजकूर लिहिलेला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
कोण काय म्हणाले ?
▪ खा. संजय राऊत : वर्षा बंगल्यावर जे काही लिहिले आहे ते मी पाहिलेले
नाही. कधी वर्षा बंगल्यावर गेलो नाहीय. अशा प्रकारचे मजकूर रंग मारून
मिटविता येतात. पण हे ज्याने कोणी केले आहे त्यांच तोंड काळं झालं आहे.
▪ अमृता फडणवीस : आम्ही महिन्य़ापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला
सोडताना सगळं तपासलेले होते. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण
दिविजा किंवा अन्य कोणी केलेले नाही.
दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment