रेल्वे
स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या नाष्टा आणि
जेवणाच्या दरांमध्ये रेल्वे मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत.
याबाबतच्या नव्या मेन्यूचे आणि दरांचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सुधारित दरांनुसार, प्रवाशांना नाष्टा आणि जेवणासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
नव्या
दरांनुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांच्या एसी फर्स्ट, एसी
सेकन्ड, एसी थर्ड डब्यांसाठी अनुक्रमे नाष्ट्यासाठी 140 रुपये आणि 105
रुपये इतका दर असणार आहे.
एसी फर्स्टसाठी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी 245 रुपये तर 185 रुपये एसी सेकन्ड आणि थर्डसाठी द्यावे लागणार आहेत.
एक्स्प्रेस, मेल गाड्यांसाठी बदललेले नवे दर…
▪ व्हेज नाष्टा : ₹35
▪ नॉन-व्हेज नाष्टा : ₹45
▪ साधारण व्हेज जेवण : ₹70
▪ साधारण व्हेज जेवण (अंडा करी) : ₹80
▪ साधारण व्हेज जेवण (चिकन करी) : ₹120
▪ व्हेज बिर्याणी (350 ग्रॅम) : ₹70
▪ अंडा बिर्याणी (350 ग्रॅम) : ₹80
▪ चिकन बिर्याणी (350 ग्रॅम) : ₹100
▪ स्नॅक मील (350 ग्रॅम) : ₹50
0 comments:
Post a Comment
Please add comment