खगोलीय घटनांमध्ये दुर्मिळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी भारतात दिसणार आहे.
हे
सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडू येथील काही भागांतून दिसेल.
उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसेल.
नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 15 जानेवारी 2010 रोजी सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.
भारताबरोबरच नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
या वेळी दिसणार ग्रहण
▪ मुंबई: 8:04-10:55 (सकाळी)
▪ अहमदाबाद: 8:06-10:52 (सकाळी)
▪ नवी दिल्ली: 8.30-11.32 (सकाळी)
▪ बंगळुरू: 8:06-11:11 (सकाळी)
▪ हैदराबाद: 8:08-11:10 (सकाळी)
▪ चेन्नई: 8:08-11:19 (सकाळी)
▪ कोलकाता: 8:27-11:32 (सकाळी)
▪ गुवाहटी: 8:39-11:36 (सकाळी)
▪ शिलॉंग: 8:39-11:37 (सकाळी)
▪ कोशिमा: 8:45-11:44(सकाळी)
सूर्यग्रहण
पाहताना काळजी घ्या : सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहण
चष्म्यातूनच पहावे. तसेच दुर्बिण किंवा द्विनेत्रीतून पाहताना योग्य
फिल्टरचा वापर करावा.
0 comments:
Post a Comment
Please add comment