ख्रिस्तमस, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर “स्वीट
कॉर्न’ला राज्यातील पर्यटन स्थळांसह गोवा, हैदराबाद येथून मागणी वाढली आहे.
त्या तुलनेत मार्केट यार्डात “स्वीट कॉर्न’चा तुटवडा आहे.
सध्या
नेहमीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात
“स्वीट कॉर्न’च्या भावात दहा दिवसांत किलोमागे 4 ते 6 रुपयांनी वाढ झाली
आहे. दहा दिवसांपूर्वी किलोस 14 ते 16 रुपये भाव मिळत होता. तो भाव आता 18
ते 20 रुपयापर्यंत पोहोचल्याची माहिती पांडुरंग सुपेकर, माऊली आंबेकर या
व्यापाऱ्यांनी दिली.
सध्या
बाजारात खेड, मंचर, दौंडकरवाडी, काळूस, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील काही
भागातून “स्वीट कॉर्न’ची आवक होत आहे. महाबळेश्वर, लोणावळा, खडकवासलासह
परराज्यांतून मागणी असल्याचे सांगून सुपेकर म्हणाले, लांबलेल्या पावसामुळे
“स्वीट कॉर्न’ची लागवड कमी झाली आहे.
काही
शेतकऱ्यांनी उशिराने लागवड केली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात माल बाजारात
दाखल होत आहे. सध्या मार्केट यार्डात दररोज 8 ते 10 टनांची आवक होत आहे. जी
गेल्या वर्षी या काळात 20 ते 30 टन होती. गेल्या वर्षी किलोला घाऊक
बाजारात 15 ते 16 रुपये भाव होता.
सध्या
मागणीच्या तुलनेत मालाचा पुरवठा कमी आहे. ख्रिसमस, नववर्षारंभ
सुट्टीनिमित्त पर्यटक थंड हवेच्या आणि इतर पर्यटन स्थळी पोहोचले आहेत.
त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत “स्वीट कॉर्न’ला मागणी चांगली राहणार आहे.
तोपर्यंत भाव तेजीत
0 comments:
Post a Comment
Please add comment