कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
परिणामी दोन्ही राज्याच्या सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. दक्षतेचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने एसटी सेवा बंद केली आहे.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याला करड्या भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. पण हा वाद आता चांगलाच चिघळल्याचे दिसत आहे.
कन्नड सिनेमाचे शो पाडले बंद : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी
कोल्हापुरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले आहेत. तसेच कन्नड
संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून
टाकले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्याच्या सीमाभागात तणाव निर्माण झाल्याने हा वाद चिघळल्याचे चिन्ह दिसत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्याच्या सीमाभागात तणाव निर्माण झाल्याने हा वाद चिघळल्याचे चिन्ह दिसत आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment