झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे
मुख्यमंत्री म्हणून आज (दि.29) शपथ घेतली आहे. रांचीतील मोरहाबादी मैदानावर
हा शपथविधीसोहळा पार पडला.
राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.
सोरेन यांच्यासह काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर उराव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाला सर्वाधिक 30 तर भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राजद महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तर 44 वर्षीय हेमंत सोरेन हे झारखंडचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरले आहेत.

0 comments:
Post a Comment
Please add comment