फेसबुकने मॅसेंजरच्या लॉगीनसाठी फेसबुक अकाऊंटची अट काढली असून त्यामुळे मेसेंजरचा वापर सोपा होणार आहे.
मेसेंजरची स्वतंत्र ओळख जोपासण्यासाठी विविध फिचर्स देण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आता फेसबुक अकाऊंट नसतांनाही मॅसेंजरचा वापर करता येणार आहे.
अर्थात, मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन न करताही मॅसेंजर वापरता येणार आहे. काही युजर्सला हा बदल दिसू लागला असून अन्य सर्व युजर्सला अपडेटच्या स्वरूपात ही सुविधा मिळणार आहे.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आधीच मॅसेंजर, इन्स्टाग्राम व व्हाटसअॅप या आपल्या तिन्ही मॅसेंजर्सला एकमेकांशी संलग्न करण्याची घोषणा केली आहे.
मॅसेंजरच्या लॉगीनसाठी फेसबुक अकाऊंटची अट काढून टाकण्याचा निर्णय हे या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment