मुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना मिळून एकत्र सरकार बनविण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी रोजच्या रोज 'जोर'बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत याबाबत सोनियांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आज दिल्लीला जाणार आहेत.
> शिवसेनेनं तुमच्या जन्माच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत, उद्धव यांचा 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल
>महाराष्ट्र शिवराय आणि संभाजींचा आहे, 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांचीभाजपवर अप्रत्यक्ष टीका
> शरद पवार समजून घ्यायला १०० जन्म लागतील - संजय राऊत
> महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल. शिवसेना त्याचं नेतृत्व करेल, राऊत यांना विश्वास
> शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरलेला नव्हता. अफवा पसरवू नका - राऊत
> शरद पवारांना त्यांच्या आघाडीतील नेत्यांशी चर्चा करावीच लागेल. त्याला आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही - राऊत
> काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पाच महिने लागले होते, २०१४ साली सत्तास्थापनेसाठी १५ दिवस लागले होते - राऊत
> सत्तास्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही, हा गोंधळ मीडियाच्या मनात - संजय राऊत
> शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू
> अगर जिंदगी में कुछ पाना है तो तरीके बदलो, इरादे नही... शिवसेना नेते संजय राऊत यांचं सूचक ट्विट
0 comments:
Post a Comment
Please add comment