संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्यात दिवेघाटात ब्रेक फेल झालेला जेसीबी थेट दिंडीमध्ये घुसला.

पुणे:  यात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज 
सोपान महाराज नामदास (वय ३६),
अतुल महाराज आळशी (वय २४) या दोन वारकऱ्यांचे दु:खद निधन झाले आहे. 
२ वारकरी गंभीर असुन आणि १० जण जखमी आहेत.





जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
वारकऱ्यांची ही दिंडी पंढरपूर ते आळंदी अशी जात होती. आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. ही दिंडी दरवर्षी पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करते. ही दिंडी दिवे घाटातून उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर १५ वारकरी जखमी झाले आहेत. 





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment