'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील'

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील', अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. सत्तापेचावर भाष्य करताना भाजप नेते आशीष शेलार यांनी शहा, मोदी समजून घ्यायला १० जन्म लागतील असे वक्तव्य केले होते. शेलार यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी हे प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होणार असून तेही शिवसेनेच्याच नेतृत्त्वात याचा पुनरुच्चार करताना राऊत यांनी शरद पवार हे देशातील अनुभवी आणि मोठे नेते असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.


राज्यातील सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही तो फक्त प्रसारमाध्यमांच्या मनात आहे. मात्र सरकार हे शिवसेनेच्याय नेतृत्वात स्थापन होणार असून आमच्याकडे १७० चे बहुमत असेल असे राऊत म्हणाले. राज्यात ६ महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावण्यात आले असून त्यापूर्वी लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांना वाटते की राज्यातील राष्ट्रपती राजवट सर्वच पक्षांना वाटते राष्ट्रपती राजवट हटली पाहिजे असे सांगताना शिवसेना राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; चर्चेला उधाण

शरद पवार हे काँग्रेसशी बोलणी करत असल्याबाबत पत्रकारांनी राऊत यांना विचारले असता, राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस आणि इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली आहे. यामुळे राज्यात सत्ता स्थापन होत असताना पवार यांनी आपल्या मित्रपक्षांना विचारणे योग्यच आहे. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न असून त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे ते म्हणाले.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king