बीजिंग: हाँगकाँगमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून लोकशाही समर्थकांचे अभूतपूर्व आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू झाल्यापासून चीनने प्रथमच हाँगकाँगमध्ये सैन्य तैनात केले आहे.
प्रस्तावित प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात सुमारे पाच महिन्यांपूर्वी हाँगकाँगमध्ये जनतेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हाँगकाँगमधून प्रकाशित होणाऱ्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठे सैन्य असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हाँगकाँग छावणीतील सैनिकांना हाँगकाँगच्या रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. हिरवे टी-शर्ट आणि काळी पँट असा वेश परिधान केलेल्या या सैनिकांनी शनिवारी पहाटे रस्त्यांवर आंदोलकांनी पसरलेले अडथळे दूर केले. आपल्या या कार्याचे हाँगकाँग सरकारशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत एक सैनिक म्हणाला, 'आम्ही हे सुरू केले आहे... हिंसाचार रोखणे आणि अनागोंदी संपवणे ही आमची जबाबदारी आहे.'
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment