श्रीलंकेत राजपक्षे विजयी.....

श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. रविवारी दुपारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांच्यावर मात केली. सात महिन्यांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार पडलं होतं. राष्ट्रपतीपदासाठी ३२ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. १.५९ कोटी मतदारांपैकी जवळपास ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
सत्तारुढ पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांनी स्वतःचा पराभव मान्य केला आहे. शिवाय प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छाही दिल्या. राजपक्षे हे श्रीलंकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष असतील. 

श्रीलंकेत राजपक्षे यांचे पारडे जड 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजपक्षे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. ‘श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल गोटाबाया यांचं अभिनंदन. दोन्ही देश शांती, समृद्धी आणि एकमेकांच्या सुरक्षेसाठी एकत्र मिळून काम करतील अशी अपेक्षा आहे,’ असं ट्वीट मोदींनी केलं. 

भारतावर काय परिणाम ? 

कोणत्याही देशाचं नेतृत्त्व बदलतं तेव्हा त्याचे परिणाम परराष्ट्र धोरणांमध्येही दिसून येतात. त्यामुळे राजपक्षे यांच्या विजयामुळे भारत-श्रीलंका धोरण कसं असेल हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. राजपक्षे हे चीनचे समर्थक मानले जातात. राजपक्षे यांचा विजय झाल्यास भारतासाठी ही निराशाजनक गोष्ट असेल, असं अगोदरच सांगितलं जात होतं. पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाचे उमेदवार प्रेमदासा यांची भूमिका कधीही स्पष्ट नव्हती. अगोदर ते चीनचे टीकाकार होते, पण नंतर त्यांचाही सूर बदलला. 


श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर 

गोटाबाया हे श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. त्यामुळेच अगोदरच गोटाबाया हे जिंकतील, असं सांगितलं जात होतं. तमिळ टायगर्सचा खात्मा केल्यामुळे राजपक्षे गट श्रीलंकेत प्रसिद्ध आहे. 

महिंदा राजपक्षे राष्ट्रपती असतानाच चीन आणि श्रीलंका यांची जवळीक वाढली. राजपक्षे यांनी २०१४ मध्ये दोन चिनी जहाजांना श्रीलंकेच्या सीमेत उभं राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच गोटाबाया यांच्या विजयामुळे चीन आणि श्रीलंका यांची मैत्री आणखी पुढच्या स्तरावर जाण्याची शक्यता आहे. चीन गेल्या अनेक दिवसांपासून हिंद महासागरात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्याला आता श्रीलंकेमुळे बळ मिळू शकतं. 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king