अभिनेत्री आलिया भट्टचा ‘सडक २’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर
प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
पोस्टर प्रदर्शित होताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सिकंदरपूर येथे राहणारे आचार्य चंद्र किशोर प्रकार यांनी चित्रपटाच्या
पोस्टरवर कैलास मानसरोवराचा फोटो वापरल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना
दुखावल्याचा आरोप करत चित्रपटाच्या पोस्टर विरोधात तक्रार दाखल केली आहे.
इंडियन एक्सप्रसने दिलेल्या वृत्तानुसार, ही तक्रार आलिया भट्ट,
दिग्दर्शक महेश भट्ट आणि चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांच्या विरोधात
आचार्य चंद्र किशोर प्रकाश यांनी केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये
चित्रपटाच्या पोस्टरमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला
गेला असल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या पोस्टवर कैलास मानसरोवरचा फोटो
वापरण्यात आला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर घराणेशाही वाद
सुरु झाला होता. नेटकऱ्यांनी स्टार किड्सवर निशाणा साधला होता. खास करुन
आलिया भट्ट आणि करण जोहरला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले होते. त्यानंतर
आलियाच्या ‘सडक २’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी
नेटकऱ्यांनी केली होती. आता चित्रपटाच्या पोस्टवरुन तक्रार दाखल करण्यात
आली आहे.
‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता
‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा
भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय
दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये
संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या
निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment