मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे - राज ठाकरे

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे - राज ठाकरे
दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं म्हटलं आहे. मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे असंही यावेळी ते म्हणाले. तसंच निवडणुकीच्या कुणाला मतदान करावं सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल…नोटांना थुंका लावत आहेत…भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत तर लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
“लॉकडाउनची शिस्त पाळा, अन्यथा अर्थसंकट निर्माण होईल”“हा जो लॉकडाउन आहे गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जे लॉकडाउन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती आहे. नोकरी राहणार का ? उद्या भाजीपाला मिळणार का ? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. जे शिस्त पाळत नाही आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. व्हॉट्सअप, चॅनेलवर ज्या बातम्या येत आहेत ते पाहूनच धक्का बसतो. आजकाल प्रत्येक घरी एक डॉक्टर झाला आहे. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, लसूण खा, कांदा खा….डॉक्टर काय उगाच मेहनत करत नाही आहेत. जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत”.
मोदींवर टीका
“सर्व डॉक्टर, शेतकरी, पोलीस, वीज-पाणी पुरवठा करणारे कर्मचारी सगळे आपला जीव धोक्या घालून काम करत आहे. पण लोकांना त्याचं गांभीर्य कळत नाही आहे. याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. आता खरं तर वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जात आहे. मृतांचा नेमकी संख्या काय आहे ? खरंच किती रुग्ण आहेत ? याबाबत संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याची जबाबदारी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीची असते. त्यांनी ती संपवायची असते,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.
“पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितलं आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचं आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत. पण नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं. देश म्हणून आपण कुठे चाललो आहेत, पुढे काय घडणार आहे लोकांना कळलं असतं.उद्योगधंद्यांना काही दिलासा दिला नाही. तर उद्या नोकऱ्यांवर परिणाम होईल,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“मुंबईच्या दंगलीतही इतकी शांतता नव्हती”
असा प्रसंग आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात आला नव्हता. असं कधी बघितलं नव्हतं. एखाद्या देशात एखादी घटना घडते हे आपण पाहिलं आहे. पण जगभर एकच गोष्ट घडतीये असं कोणी पाहिलेलं नाही. मी इतकी शांतता मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती.
“१४ तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही”
“जर अशा प्रकारे लोक वागत राहिले आणि करोनाचे रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाउन वाढवावाच लागेल. १४ तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही. सगळे घऱात थांबले तरच वैद्यकीय कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना माहिती मिळण्यात मदत होईल. ते काय जेलमध्ये टाकणार नाही आहेत. इतरांना त्रास होऊ नये यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. मला वाटतं समाजावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ पण असावं लागतं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना सल्ला
भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर बोलताना राज ठाकरे यांनी त्याची योग्य व्यवस्था केली पाहिजे असं म्हटलं. “मला सरकारवर टीका करायची नाही. आता ती योग्य वेळ नाही. परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला हवी. सरकारने तशी व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक विभागवार यंत्रणा राबवली पाहिजे. सरकार करत नाही अशातला भाग नाही, पण ती नीट केली पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment