#DiyaJalaoBharatJodo | मनोबल वाढवण्यासाठीचा एक विचार

आवाज आणि उजेड या गोष्टी करोना घालवण्यासाठी नाहीत.  करोना विरुद्ध लढणाऱ्या डॉ, नर्स, मेडिकल सेवा देण्याऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी घंटा व थाळीनाद केला गेला. दिवे लावण्याचा उद्देश तुरुंगासारखं जीवन व्यतीत करणाऱ्या सामान्य निर्दोष जनतेच्या संयमाचा बांध तुटून अराजकता पसरू नये यासाठी आहे. 
5 एप्रिल ला बरोबर निम्मे दिवस लॉकडाऊनला झालेले असतील. निम्मी लढाई बाकी असेल, त्यांचं मनोबल तुटून जर सर्व रस्त्यांवर आले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासाठी प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा विचार करता त्यांना वेळीवेळी प्रेरित ठेवणं हे राष्ट्रीय स्तरावरील सर्वांचेच कर्तव्य आहे. 
युद्ध-लढाईमध्ये ज्याला WAR CRY म्हणतात त्यामुळे युद्ध जिंकता येत नसते. पण लढणाऱ्या आपल्या सेनेचे मनोबल वाढवण्याचा एक भाग असतो.‘हरहर महादेव’, ‘जय भवानी’ अशा रण घोषवाक्यांनी एकी रहाते,लढायचे बळ मिळते हे शिवकाळापासून देशाने अनुभवले आहे की त्यांची पण थट्टा करायची आहे?
 माजी प्रधानमंत्री अटलजी यांच्या कवितेनुसार छोटे मन से कोई बडा नहीं होता, तुटे मन से कोई खडा नहीं होता हे ओळखूनच येणाऱ्या मोठ्या संकटासाठी आपली मानसिकता तयार केली जात आहे. मनोबल व एकता अखंड रहावे यासाठीचा प्रयत्न म्हणजे #DiyaJalaoBharatJodo
यागोष्टी सांगितल्या म्हणजे PMO आणि प्रशासनाने इतर सर्व कार्य थांबवले आहे आणि सर्व प्रशासन, राज्य सरकारं झोपा काढताय असा अर्थ होतच नाही. केंद्र, राज्य सरकारं काय निर्णय घेताय, कधी घेताय ते सर्व आपल्यापर्यंत येत नसतं. त्यामुळे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारख न वागता सामान्य जनतेने राजकारणात न पडता योग्य वर्तन करून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे कधीही योग्य. 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king