पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे - राज ठाकरें |
सर्व नागरिकांनी देशात लावलेला लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. तर लॉकडाऊनची शिस्त पाळली नाही तर अर्थिकसंकट निर्माण होईल, अशी भितीही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊन यावर भाष्य केलं आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून एवढी शांतता 1992-93 च्या दंगलीदरम्यानही पाहिली नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
“पोलिसांवर हल्ले कऱणाऱ्यांवर फक्त केसेस टाकून चालणार नाही तर यांना फोडून काढलं पाहिजे. त्याचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजेत. मी एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये घरातील लोकांनी मिळून पोलिसांना मारलं. भेंडी बाजारमध्ये पोलिसांना शिव्या घातल्या जात असतानाचा एक व्हिडीओ आला. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, यावर कडक पावलं उचलावी लागतील. याचा संदेश संपूर्ण समाजभर जाण्याची गरज आहे. हे लपून छपून करण्यासारखं नाही. ज्याप्रकारे ही लोक वागत आहेत त्यांना काय प्रकारची शिक्षा मिळत आहे हे सर्वांना कळणं गरजेचं आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment