लंडनहून भारतात परत आल्यावर सोनम कपूर आयसोलेशनमध्ये |
करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सेलिब्रिटी स्वतःला आयसोलेट करत आहेत. या काळात ते घरातच वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टिव्हिटी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
करोना व्हायरसच्या वाढच्या संसर्गामुळे अनेक सेलिब्रिटींनी घरीच राहणं पसंत केलं आहे. तसेच हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी ते स्वतःच इतरांपासून दूर राहणं पसंत करत आहेत. या दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही पती आनंद अहूजासोबत लंडनहून भारतात परतली. या दोघांनीही स्वतःला त्यांच्या दिल्लीच्या घरात आयसोलेट करून घेतलं आहे. या दरम्यान ती काय करत आहे आणि काय खाते याचे अपडेट तिने यावेळी सोशल मीडियावर दिले आहेत.
आनंद सोबत जेवतेय सोनम-
लंडनहून परतल्यानंतर सध्या सोनम कपूर दिल्लीला नवऱ्याच्या घरी राहत आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सोनमने इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला. यात ती घरातलं पौष्किक जेवण जेवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी सोनमचा नवरा आनंदही दिसतो. तो स्वतःला व्हिडिओमध्ये येऊ नये म्हणून लपवत असतो.
मनोरंजन क्षेत्रात करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अनेक सिनेमांचे आणि मालिकांचे चित्रीकरण तातडीने बंद करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य सरकारने मॉल, जिम, शाळा- कॉलेजही बंद ठेवले आहेत. आता अनेक सेलिब्रिटी घरीच व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यापासून दिलीप कुमार यांच्यापर्यंत अनेकांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment