पुणे: शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपाआधीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष लगेचच सक्रिय झाला आहे. 'आज अशा अनेक बातम्या मिळतील,' असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसांत सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 'ही पहिली बातमी आहे. अशा अनेक बातम्या आता येतील,' असं ते म्हणाले.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. 'ही आघाडी चुकीच्या आधारावर निर्माण झाली आहे. त्यामुळं हे सगळं होतच राहणार. आम्ही आधीच हे सांगितलं होतं,' असं मुनगंटीवार म्हणाले.

0 comments:
Post a Comment
Please add comment