भारतीय वंशांच्या 2 महिला न्युयॉर्कमध्ये न्यायाधीशपदी |
अमेरिकेतील न्युयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी भारतीय वंशाच्या दोन महिला वकिलांना दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे.
न्यायाधीश दीपा आंबेकर यांना दिवाणी न्यायालयात तर न्यायाधीश अर्चना राव यांना फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
अर्चना राव यांना याआधी जानेवारी 2019 मध्ये दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. न्युयॉर्क काउंटी जिल्हा अॅटॉर्नी कार्यालयात 17 वर्षांपासून कार्यरत आहेत.
मे 2018 मध्ये आंबेकर यांना दिवाणी न्यायालयात अंतरिम न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आले होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment