अहमदनगर: खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ
नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट
शब्दांत फेटाळून लावली आहे. 'आमच्या पक्षात गृहमंत्रिपद नको, नको म्हणणारेच
जास्त आहेत,' असा 'स्ट्रेट ड्राइव्ह' पवारांनी मारला आहे.
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा
पहिला शपथविधी होऊन महिना उलटला आहे. नुकताच या सरकारनं मंत्रिमंडळाचा
विस्तारही केला. या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यानं तिन्ही पक्षातील अनेक
आमदार नाराज असतानाच आता खातेवाटपावरून राष्ट्रवादी धुसफूस असल्याचं समोर
आलं आहे. नगरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी याबाबत
विचारलं असता, तसं काहीही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
'खाते वाटपावरून आमच्या पक्षात काहीही व कोणतही नाराजी नाही. आठ
दिवसांपूर्वीच खातेवाटप निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज
संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नव्या मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करतील,'
असं पवार म्हणाले. गृहखात्यावरून सुरू असलेल्या खेचाखेचीवर पवार म्हणाले,
'गृहखाते आम्हीच अनेकांना देत होतो. पण आमच्याकडं अनेक जण नको म्हणत होते.'
खातेवाटपाला उशीर होत असल्याचा आक्षेपही त्यांनी खोडून काढला. 'पूर्वी एक
पक्षाचे सरकर असताना शपथविधी झाल्यानंतर दोन-दोन दिवस खातेवाटप होत नव्हते.
आता तर राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे,' असं ते म्हणाले.
Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.
0 comments:
Post a Comment
Please add comment