दर्यापूर
तहसीलमध्ये आकस्मिक भेट देऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी
उपविभागीय आणि तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली. अकारण त्रुटी काढून
वर्षभरापासून अंत्योदय कार्डचे प्रकरण प्रलबिंत ठेवल्याचा ठपका ठेवत पुरवठा
निरीक्षक व निरीक्षण अधिकारी यांच्या निलबंनाचे आदेश दिले. राज्यमंत्री
झाल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात कडू यांनी केलेल्या या कारवाईने अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश
झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच बच्चू कडू जिल्ह्यात दाखल झाले.
अमरावतीमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर ते दर्यापुरात आले.
शहरात प्रवेश करताच कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांचा ताफा तहसील
कार्यालयाकडे वळला. राज्यमंत्र्यांचा ताफा पाहताच अधिकाऱ्यांची तारांबळ
उडाली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात कडू यांनी हजेरी पुस्तक मागवून
कोणते कर्मचारी अनुपस्थित आहेत, याची खातरजमा करून घेतली. कार्यालयात
उपस्थित नागरिकांनी त्यांच्याकडे विविध विषयांवरील प्रलंबित प्रकरणांच्या
तक्रारी केल्या. त्यानंतर कडू यांनी प्रकरणाशी सबंधित अधिकाऱ्यांना बोलावून
प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले. याउपर सदर प्रकरणे प्रलंबित
राहिल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनादेखील उपविभागीय अधिकारी व
तहसीलदारांना दिल्या. सोबतच अनुकंपा, आदिवासी जमीन पट्टा, उमरी कुबेरीतील
कब्रस्तान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटींचा निपटारा न
केल्यावरून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तर अंत्योदय कार्डचे प्रकरण
वर्षभरापासून प्रलंबित ठेवल्यावरून पुरवठा निरीक्षक व निरीक्षण अधिकारी
यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश कडू यांनी दिले. त्यामुळे तहसीलदार
योगेश देशमुख यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी
यांच्याकडे पाठविला आहे.
Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.
0 comments:
Post a Comment
Please add comment