मुंबई : देशभर गाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या (PMC बँक) घोटाळ्याची पूर्वसूचना बँकेतील एका जागरूक कर्मचाऱ्याने (whistle blower) बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला दिली होती. HDIL कंपनीच्या बनावट कर्ज खात्यांची आणि त्यात झालेल्या घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला कळवली नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा या जागरूक कर्मचाऱ्याने व्यवस्थापनाला दिला होता. हा जागल्या दुसरा तिसरा कोणी असून तो बँकेचा एक कमर्चारी आहे, अशी धक्क्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.PMC बँक घोटाळ्याप्रकरणी आज सादर होणाऱ्या तब्बल ३२ हजार पानी आरोप पत्रात पोलीसांनी पहिल्यांदाच 'जागल्या'चा (whistleblower) उल्लेख केला आहे.
PMC बँक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ३२ हजार पानांचे आरोप पत्र आज सादर केले जाण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांच्या तपासानंतर आरोप पत्र तयार करण्यात आले आहे. या आरोपत्रात पहिल्यांदाच पोलीसांनी 'जागल्या'चा (whistleblower) उल्लेख केला आहे. HDIL कंपनीची बनावट कर्ज खाती आणि त्यात घोटाळा झाल्याचे जागल्याच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्याने ही बाब बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवली. या घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला कळवली नाही तर आत्महत्या करु, असा इशारा व्यवस्थापनाला दिला होता मात्र त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. या मुद्द्यावर जागल्या आणि वरिष्ठ व्यवस्थापनात प्रचंड वादावादी झाली आणि अखेर घोटाळा समोर आला. घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने 'पीएमसी' बँकेवर निर्बंध घातले. यात लाखो लोकांचे पैसे अडकले असून मानसिक तणावाने काही खातेदारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment