मनोज तिवारींचं मोदींना पत्र

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरु यांचा जन्मदिन म्हणजेच १४ नोव्हेंबर हा दिवस देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो. पण आता बालदिनाची तारीख बदलण्यात यावेळी अशा मागणीनं जोर धरला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी बालदिनाची तारीख बदलण्याची मागणी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनाऐवजी गुरू साहिब श्री गुरुगोविंद सिंह यांचे पुत्र साहिबजादा फतेह सिंह यांच्या बलिदान दिनी देशात बालदिन साजरा केला जावा, अशी मागणी मनोज तिवारी यांनी पत्रातून केली आहे.

आपल्या देशात लहान मुलांसाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे. त्यात साहिबजादा फतेह सिंह यांचं मोलाचं योगदान आहे. साहिबदाजा फतेह सिंह आणि जोराबर सिंह यांनी १७०५ साली कडाक्याच्या थंडीत फतेहगड साहिबच्या किल्ल्यावर शौर्य गाजवत धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यामुळे लहान मुलांसाठी केलेल्या या बलिदानाचा विचार करून देशात फतेह सिंह यांच्या बलिदान दिनी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी दरवर्षी बालदिन साजरा केला जावा, असं मनोज तिवारी यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज तिवारी यांनी केलेल्या या मागणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king