1. NRC हा CAA चा भाग आहे का ?
नाही. CAA हा एक वेगळा कायदा आहे आणि NRC ही वेगळी प्रोसेस आहे. आपल्या संसदेने दोन्ही सभागृहातुन बहुमताने पास केल्यानंतर संपूर्ण देशभर CAA लागू झाला आहे. NRC चे नियम आणि पद्धती अजून तयार झालेली नाही. आसाम मध्ये लागू झालेली NRC ही सुप्रीम कोर्टाद्वारे इम्प्लिमेंट केली जात आहे. आसाम अकॉर्ड मध्ये सुद्धा NRC अनिवार्य करण्यात आली होती.
2. भारतीय मुस्लिमांना CAA आणि NRC मुळे काळजी करण्याची गरज आहे का ?
कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकाला CAA आणि NRC मुळे काळजी करण्याची काहीही गरज नाही.
3. NRC ही एखाद्या विशिष्ट धर्मासाठी आहे का ?
नाही. NRC चा आणि कोणत्याही धर्माचा काहीही संबंध नाही. देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी NRC आहे. NRC हे नागरिकांचं रजिस्टर आहे, ज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाचे नाव नोंदवलेले असेल.
4. लोकांना धर्माच्या आधारावर NRC मधून वगळण्यात येईल का?
नाही. NRC चा कोणत्याही धर्माशी काहीही संबंध नाही. जेंव्हा केंव्हा NRC लागू होईल, तेंव्हा ना धर्माच्या आधारावर लागू होईल आणि ना त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोणतीही व्यक्ती फक्त एखाद्या विशिष्ट धर्माची असल्याच्या कारणामुळे NRC मधून वगळण्यात येणार नाही.
5. NRC लागू झाल्यानंतर, आम्हाला भारतीय नागरिक असल्याचे पुरावे द्यावे लागतील का ?
पहिल्यांदा संपूर्ण देशाला हे माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे की NRC च्या प्रोसेस बद्दल अजून कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये. NRC ची अंमलबजावणी झाली, याचा अर्थ प्रत्येकाला भारतीय असल्याचा पुरावा द्यावा लागेल असं नाहीये. NRC ही साधारण प्रोसेस आहे, ज्याच्या रजिस्टर मध्ये फक्त तुम्हाला तुमचे नाव नोंदवायचे आहे. आपण आपलं मतदानाचं ओळखपत्र काढताना, किंवा आधारकार्ड काढताना आपले जे ओळखपत्र दाखवतो, अगदी तसेच ओळखपत्र NRC मध्ये नाव नोंदवताना दाखवणे गरजेचे असेल आणि ते ही जेंव्हा NRC ची प्रोसेस सुरू होईल तेंव्हा.
6. नागरिकत्व कसे ठरवले जाते ? नागरिकत्व देणे सरकारच्या हातात असते का ?
कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व नागरिकत्व नियम, 2009 नुसार ठरवले जाते. हे नियम नागरिकत्व कायदा, 1955 वर आधारित आहेत. हे नियम सार्वजनीकरित्या प्रत्येकापुढे असतात. भारतीय नागरिक होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसमोर पाच मार्ग आहेत.
1. जन्माने
2. वंशाने
3. नोंदणी करून
4. नैसर्गिकरण
5. अंतर्भाव करून
7. माझं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मला माझ्या आई-वडिलांच्या जन्माचा तपशील द्यावा लागेल का ?
फक्त तुझा जन्माचं तपशील जसं की जन्मतारीख, जन्म स्थळ तुझं नागरिकत्व ठरवण्यासाठी पुरेसं असेल. जर तुझ्याकडे तुझ्या जन्माची काहीही माहिती नसेल तरच मग तुला तुझ्या आई किंवा वडिलांचे जन्माचे तपशील द्यावे लागेल. परंतु हे ही लक्षात घ्या की आई-वडिलांचे कागदपत्रे भरावे लागतील, असं बंधन अजिबात नाही. नागरिकत्व हे जन्मतारीख आणि जन्मस्थळ संबंधित कोणतंही कागदपत्रे भरून सिद्ध करता येईल. तरी अजूनसुद्धा कागदपत्रे स्वीकारण्याबद्दल निर्णय झाला नाही. परंतु पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, परवाना, इंश्यूरन्स पेपर, जन्म प्रमाणपत्र, शाळेची TC आणि तसेच घर, जमीन व अन्य सारखे कागदपत्रे स्वीकारण्याची जास्त शक्यता आहे. या लिस्ट मध्ये अन्य अजून कागदपत्रे येतील जेणेकरून लोकांनां जास्त त्रासाला सामोरं जावं लागणार नाही.
8. मला 1971 पूर्वीचं वंश सिद्ध करावं लागेल का ?
नाही. ज्यांची 1971 पूर्वीची वंशावळ आहे, त्यांना कसल्याही 1971 पूर्वीच्या वशंजांचं कोणतंही कागदपत्रे भरावे लागणार नाहीत. हे फक्त आसाम NRC साठी valid असेल. बाकी संपूर्ण देशासाठी NRC प्रोसेस ही पूर्णतः निराळी असेल.
9. जर हे एवढं सोपं आहे, तर मग आसाम मध्ये 19 लाख लोकं का प्रभावित झाली ?
आसाम मध्ये घुसखोरी ही जुनी समस्या आहे. त्याला रोखण्यासाठी 1985 मध्ये आंदोलने झाली. त्यावेळी तेंव्हाच्या राजीव गांधी सरकारला घुसखोरांना ओळखण्यासाठी NRC तयार करण्यासाठी करार करावा लागला आणि त्यासाठी 25 मार्च 1971 ही कट ऑफ तारीख ठरवण्यात आली.
10. NRC प्रोसेस दरम्यान आम्हाला जुने कागदपत्रे जे की जमा करणे खूप कठीण आहे, असे भरावे लागणार आहेत का ?
असं काहीच नाही. ओळख पटवण्यासाठी सामान्य कागदपत्रे पुरेसे असतील. जेंव्हा NRC संपूर्ण देशात लागू होईल तेंव्हा नियम आणि अधिनियम ठरवण्यात येईल. सरकारची स्वतःच्याच नागरिकांना त्रासात टाकण्याची कसलीही मनशा नाही.
11. जर एखादा व्यक्ती अशिक्षित आहे आणि आवश्यक कागदपत्रे देण्यात असमर्थ असेल तर त्याच काय ?
आशा केस मध्ये अधिकारी त्या व्यक्तीला एक साक्षीदार बोलावण्यास मुभा देतील आणि त्यासोबत पुरावे आणि समुदायाने व्हेरिफाय करण्यास पण परवानगी देण्यात येईल. एक सुयोग्य पद्धती अवलंबिली जाईल. कोणताही भारतीय नागरिक अनावश्यक त्रासाला सामोरं जाणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment