गेल्या काही दिवसांपासून पावसाला पोषक हवामान तयार होत
आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र,
मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत असून, गारठा कमी झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यालगतच चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान आहे.
मंगळवारी
सायंकाळी पुणे आणि जुन्नर परिसरात हलका पाऊस पडला. बुधवारी दिवसभर
राज्यातील अनेक भागांत हवामान ढगाळ होते. यामुळे किमान तापमानात वाढ झाली
आहे. बुधवारी सकाळी नाशिकमधील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये १३.०
अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
ढगाळ
हवामानामुळे कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर परिसरातील
किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या भागात किमान
तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
मध्य
महाराष्ट्रासह खानदेशातही गारठा कमी झाला आहे. या भागात किमान तापमान १३
ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही किमान तापमान १७ ते २०
अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागांत गारठ्यात चढउतार आहे.
चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागांतील किमान
तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.
(Source imd Pune)
0 comments:
Post a Comment
Please add comment