थर्टी फर्स्ट' व नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी एकूणच जागोजागी होणाऱ्या पार्ट्या, रेस्टॉरंट यांमधील आयोजने व गर्दी यंदा २० ते २५ टक्के कमी असेल, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारने यंदा पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे हॉटेल क्षेत्रात चांगला उत्साह आहे. तीन तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये नावाजलेले गायक-गायिकांचे संगीत कार्यक्रम तसेच, डीजेच्या तालावरील पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे तिकीट साधारण दोन हजार रुपयांपासून सुरू होते. जोडप्यांसाठी तीन हजार रुपयांपासून तिकिटे आहेत. त्यामध्ये मनसोक्त डान्स, मद्य व स्टार्टर आदींचा समावेश आहे. मोठी हॉटेले नववर्षाचे स्वागत ग्राहकांसह करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु लहान रेस्टॉरंटमध्ये काहीसा कमी उत्साह असल्याचे दिसून येते.
'मोठ्या हॉटेलांमध्ये पार्ट्या आहेतच; पण लहान रेस्टॉरंटमध्ये गर्दी काही प्रमाणात कमी होईल असे दिसून येत आहे. आजकाल नववर्षासाठी अनेकजण शहरापासून दूरच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे रेस्टॉरंटची गर्दी २५ टक्क्यांपर्यंत कमी असेल असा अंदाज आहे', असे इंडियन हॉटेल्स अण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.
शहर व उपनगरांतील मॉलदेखील नववर्ष स्वागतासाठी सज्ज आहेत. काही मॉल आज, मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. काही मॉल्समध्ये व्यवस्थापनाकडून विशेष खेळ व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
चौपाट्यांवर गर्दी
नववर्ष स्वागतासाठी अनेकजण कुटुंबासह समुद्रकिनारी जातात. यासाठीच दादर, जुहू, गिरगाव चौपाट्यांवरील खाऊगल्ल्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. सध्या अनेक शाळांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे चौपाटी तसेच फिरण्याच्या ठिकाणी कुटुंबांची गर्दी रविवारपासूनच सुरू झाली आहे. सोमवारीदेखील सायंकाळी अनेकजण कुटुंबासह सीएसएमटी व चर्चगेट स्थानकांवर उतरून गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्हकडे जाताना दिसले.

0 comments:
Post a Comment
Please add comment