30 डिसेंबर 1970 हा भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडल्यानंतर देशभरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विभागात नव्याने संघटना बांधण्याचे काम सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून ए. आय. एस. एफ ही देशातील पहिली विद्यार्थी संघटना. ज्याचा मुख्य उद्देश स्वातंत्र्य मिळवण हा होता. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे कम्युनिस्ट पक्षात फुट पडून दोन पक्षी निर्माण झाले . त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष( मार्क्सवादी) च्या नेतृत्वाखाली 30 डिसेंबर 1970 साली केरळ राज्याची राजधानी त्रिवेंद्रम या शहरात स्थापना अधिवेशन पार पडले. याची स्थापना अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी एस. एफ. आय. चे पहिले अखिल भारतीय अध्यक्ष आणि सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्युरो मेंबर बिमान बसू आणि केरळमधील सी भासकरण यांनी देशभरात फिरून भारताच्या वेगवेगळ्या राज्यात कार्यरत असणारे विद्यार्थी संघटनांचे छोटे छोटे गट यांना संपर्क करून एकत्र आणून या स्थापना अधिवेशनाचे आयोजन केले होते .
शहीद भगतसिंग
यांना आदर्श मानून अभ्यास आणि संघर्ष! सर्वांना शिक्षण सर्वांना काम! घोषणा
घेऊन देशातल्या जात्यंध आणि धर्मांध शक्तीच्या विरोधात लढत असताना
स्वातंत्र्यानंतर 2500 पेक्षाही जास्त कार्यकर्त्यांचे बलिदान देणारी आणि
केवळ घोषणा देऊन न थांबता भगतसिंगांच्या पावलावर पाऊल ठेवून आगेकूच करणारी
देशातील एकमेव विद्यार्थी संघटना विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या सर्व
कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा।
।।। इन्कलाब जिंदाबाद।।।
एकूण सभासद - 43 लाख
मुख्य व्यक्ती - व्ही. पी. सानू
मुख्यालय: नवी दिल्ली
0 comments:
Post a Comment
Please add comment