हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू खाण्याचे शरीराला फायदे. थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही असलेल्या व्यक्तींनी रोज एक चिकू खाणं आवश्यक आहे.
1.चिकूतील कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित ठेवतं. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते.
2.डोळ्यांसाठी चिकू खाणं फायदेशीर असतं. दृष्टी चांगली होते. यासोबत चिकूतील पोषक तत्व शरीरातील अनेक इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात
3.तुम्हाला अपचनाची अथवा गॅसची समस्या असेल तर आवर्जुन चिकूचं सेवन करा.पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.
4.कफ आणि श्वासनासंबंधी आजार दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते. चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.
5.चिकू खाल्ल्यानं लहान मुलांना ताकद तर मिळतेच पण मानसिक ताण कमी होतो असंही समजलं जातं. याशिवाय झोपही शांत लागते. अशक्तपणा ज्यांना आहे अशा व्यक्तींनी तर केळ चिकू सारखे पदार्थ खाणं गरजेचं आहे.
6.ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
7. छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होते. मात्र त्यावर आराम मिळवायचा असेल तर चिकू अतिशय उपयुक्त ठरतो.
8. सुक्यामेव्या सोबत म्हणजेच ड्राय़फ्रूटसोबत सुकवलेला चिकू रोज सकाळी खाल्ला तरीही शरीराला फायदा होतो.
9. शक्यतो चिकूचा मिल्कशेक घेण्यापेक्षा नुसतं फळ म्हणून चिकू खाल्ला तर त्यापासून शरीराला मिळणारे व्हिटॅमिन्स आणि होणारे फायदे अधिक आहेत.
10. हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश केला तर पोटाच्या विकारांपासून सुटका मिळू शकते. यासोबतच शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king