मध्य रेल्वेची वाहतूक 4 तास बंद; स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी

         
 
नाताळच्या सुट्टीचेनिमित्त साधत मध्य रेल्वेने आज (दि.25) ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचा निर्णय घेतल्याने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. 

मेगाब्लॉकमुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी 10 ते दुपारी 2 च्या दरम्यान बंद राहणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. 

मध्य रेल्वेने 10 वाजण्याआधीच मेगाब्लॉक सुरु केल्याने डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. 

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधून तयार आहे. या पुलावर 6 मीटर लांबीचे चार गर्डर शक्तिशाली क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात येणार आहेत. 

हे काम 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम विनाअडथळा पूर्ण व्हावे, यासाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानची सेवा बंद करण्यात आली आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment