निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी,
यांसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी
राळेगणसिध्दीत मौन आंदोलन सुरु केले आहे.
त्यांच्या या मौन व्रत आंदोलनाचा आज (दि.24) पाचवा दिवस असून सरकारकडून मात्र कोणतीही हालचाल झाल्याचे दिसत नाही.
काय आहेत मागण्या? :
▪ देशभरातील अत्याचाराबाबतचे प्रलंबित प्रकरने निकाली काढावे.
▪ दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी.
▪ संसदेत प्रलंबित असलेला ज्युुडीसीईल हा कायदा आंबलात आणावा.
▪ पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना नेमावे.
▪ राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी.
सरकारने
लवकरात-लवकर यावर तोडगा काढला नाही, तर गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा
दिला आहे. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार
आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment