जर तुमच्या कड़े नैसर्गिक खुडूक बसलेली कोंबडी असेल तर उत्तम !!!
नसेल
तर अंडी उत्पादन बंद झालेल्या गावठी कोंबडी खाली एक अंड ठेवावे, ते ती
स्वतःच्या पोटा खाली घेऊन बसते. साधारण 5 ते 6 दिवस ती ते अंडे घेऊन बसली
की ती खुडूक आहे असे समजावे. या काळात सुधारित जातीच्या कोंबडी ची फ़लित
अंडी उपलब्ध करावित.
कोंबडी रोनावर बसवणे
🔹साधारण
एका वेळेस एक पेक्ष्या जास्त कोंबड्या एकदम रोनावर अंडी उबवण्यास
बसवाव्यात जेणेकरून साऱ्या कोंबड्यांना एकत्र मिळून पिल्ल संभाळने सोप्पे
जाते आणि मरतुक कमी करता येते.
गोलाकार भांडे किंवा बांबू ची बुट्टी किंवा पाटी मधे भाताचा भूसा अंथरून त्यावर कोंबडी अंडी उबवण्यास बसवावि.
जास्त कोंबड्या एकत्रित रोनावर बसविण्याचे फायदे
जेवढी
पिल्ल निघतिल ती सर्व एकत्र केलि जातात ज्यामुळे प्रत्येक कोंबडी ला आपली
पिल्ल वेगळी काढता येत नाहीत किंवा ओळखता येत नाहीत. नाइलाजाने त्या सर्व
पिल्लाना मातृत्वाने संभाळतात.
🔹
सुरुवातीचे काही दिवस कोंबड्या एकमेकींशी भांडतात पण नंतर मिळून पिल्लांचे
संगोपन करतात. याचा असा फायदा होतो की पिल्ल विभागलि गेल्यामुळे योग्य ऊब
मिळते जी पिल्लच्या वाढी च्यादृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
🔸
अनेक कोंबड्या मिळून पिल्ल जेव्हा संभाळतात तेव्हा काही कोंबड्या ह्या
नैसर्गिक शत्रुंचे निरिक्षण किंवा पिल्लांचि राखण करण्यात व्यस्त राहतात
त्या ऐवजी काही कोंबड्या चारा शोधून पिलांचे पोट भरण्यात व्यस्त राहतात
ह्यामुळे कावळा, घार किंवा मांजरा सारख्या नैसर्गिक शत्रुन पासून चांगले
रक्षण मिळते.
🔹 नैसर्गिक
शत्रूंमुळे होणारी पिलांची मर कमी होते आणि उत्तम वाढ राहते तसेच नैसर्गिक
वातावरणात आई सोबत मुक्त संचारा मधे वाढ झाल्यामुळे पिल्लांचि रोगप्रतिकार
क्षमता उत्तम राहाते.
0 comments:
Post a Comment
Please add comment