झारखंड
विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली असल्याने आता तरी भाजपने
आत्मपरीक्षण करावे, असा टोला शिवसेना खा.संजय राऊत यांनी लगावला आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीत 81 जागांपैकी 42 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर 29 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
त्यामुळे आता झारखंडमध्येही भाजप आपली सत्ता गमवत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावरुन खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
राऊत
म्हणाले : झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित
शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. मात्र झारखंडमधील जनतेने भाजपला नाकारले.
महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडदेखील भाजपच्या हातातून निसटले. त्यामुळे
भाजपने आत्मचिंतन करावे.
0 comments:
Post a Comment
Please add comment