सोशल मीडियावर गत काही दिवस भारतीय चलनात 350 रुपयांची नोट दिसत आहे.
रिझर्व बँकेने 350 रुपयांची नवी नोट चलनात आणल्याची अफवा असल्याचे संबंधित
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
व्हिडीओ व्हायरल : काही दिवस एक
व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एका व्यक्तीच्या हातात 350 रुपये
नोटांच्या दोन गड्ड्या दाखविल्या जात आहेत.
फेसबुकसह इतर सोशल मिडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. देशात नवीन नोटा चलनात आणण्याचा अधिकार रिझर्व बँकेकडे आहे. या बँकेकडून ज्या नोटा चलनात आणल्या जातात, त्या सर्वाचे फोटो बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर आहेत.
त्यामुळे सध्या चलनात 10,20,50,100,200,500 व 2000 च्या नव्या नोटा आहेत. 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदीनंतर 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या होत्या, 1000 ऐवजी 2 हजारची नवी नोट चलनात आली.

आवाहन : सोशल मिडीयावर जी नोट 350
रुपयाची नोट शेअर केली जात आहे, ती प्रत्यक्षात 200 रुपयांची नोट असून
त्यात छेडछाड केली असल्याचे आरबीआय प्रवक्त्यांनी सांगितले आहे. तसेच
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment