केंद्र सरकारकडून नोटाबंदीनंतर नुकतीच चलनात आलेली 2 हजार रुपयांची नोटा
रद्दचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक दिवसांपासून
सर्वसामान्यांमध्ये या नोटा बंद होण्याच्या चर्चा सुरु होत्या.
दरम्यान सरकारच्या स्पष्टीकरणानंतर आता ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी राज्यसभेत याबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान सरकारच्या स्पष्टीकरणानंतर आता ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी राज्यसभेत याबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले.
अर्थराज्यमंत्री यांचे स्पष्टीकरण : 2
हजारांच्या नोटा रद्द होणार नसल्याने कुठलीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे
त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान स.पा.चे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी प्रश्न केला की, या नोटा रद्द करण्याची सरकारची काही योजना आहे का? हा प्रश्न केल्यानंतर केंद्र सरकारतर्फे त्यास लेखी उत्तर देण्यात आले.
दरम्यान स.पा.चे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी प्रश्न केला की, या नोटा रद्द करण्याची सरकारची काही योजना आहे का? हा प्रश्न केल्यानंतर केंद्र सरकारतर्फे त्यास लेखी उत्तर देण्यात आले.
खासदार निशाद म्हणाले : चलनात 2 हजारची नोट
आल्याने काळ्या पैशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार ही नोट
रद्द करुन पुन्हा 1 हजार रुपयांची नोट चलनात आणत असल्याची चर्चा जनतेमध्ये
सुरु आहे, असे निशाद यांनी म्हटले होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment