भगवा कायम प्राणप्रिय राहील पण या भगव्याच्या जीवावर निवडून येऊन यांनी भगव्याला सुरुंग लावायचा प्रयत्न केला!
मध्ये फेसबुकवर प्रत्येक पोस्टला पाच पाच हजार लाईक्स घेणाऱ्या पंटरच्या फेसबुकवर च्या राजीनाम्याची पोस्ट वाचण्यात आली आणि कुठेतरी कळलं एका विचारसरणीला प्रामाणिक राहून ग्राउंड लेव्हल ला आपण हजारो लोकांशी वाकडं घेतो हे घातक आहे.
पवारांच्या विरुद्ध पोस्टी लिहून एका दिवसात 10 हजार लाईक्स घेतले त्यानं पवारांचं काहीही **t वाकडं झालेलं नाही, जितेंद्र आव्हाड ला बेफाट ट्रोल केलं तरी challenge देऊन 75,500 च्या मार्जिन ने गडी निवडून आला आता सत्तेत पण बसलाय. त्यावेळी ट्रोल करताना मजा वाटली आता तोंड लपवून बसावं लागतंय याचं कारण राष्ट्रवादी किंवा पवार किंवा आव्हाड नसून ज्यांची बाजू घेऊन तहानभूक हरपून लढलो तीच माणसे आहेत हे दु:ख पचवणं जास्त वेदनादायक आहे!
पक्षीय पातळीवर हे बाजारबुणगे वाट्टेल तेंव्हा एकमेकांना G वर लाथ मारणार आणि वाट्टेल तेंव्हा एकमेकांच्या G चा मुका घेणार पण जमिनीवर राहून यांच्यासाठी रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय??
भाई आपला पेपरवाला काँग्रेसचा, तर दूधवाला मनसेचा,कंपनीतला बॉस भाजपचा, तर सासरा राष्ट्रवादीचा, राष्ट्रीय स्तरावर असेल भाजप पण नगरसेवक NCP चा आहे त्याच्याकडे काम घेऊन जायची भीती आणि भाजपच्या नगरसेवकाकडे जायचे वांधे. सोशल मीडियावर ट्रोल करून ख्या ख्या ख्या चे स्माईली सोडले तर कुणाकुणाशी किती वाकडं घेऊ शकतो सामान्य माणूस?
उद्या भाजप सोडून तीन पक्षांची सत्ता आल्यावर ती काय फार साजुक तुपातली असेल असं समजायचं कारण नाही पण तशी ती आपली सुद्धा नव्हती! टीका तेंव्हाही त्यांच्यावर करता येईल पण आत्तापर्यंत ज्यांची बाजू घेऊन लढलो त्याची तुमच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यातली आत्तापर्यंतची गोळाबेरीज काय??
शून्य!
बघा अजून काही आठवत का?!
- ऍड. अंजली झरकर
0 comments:
Post a Comment
Please add comment