तमिळनाडू : तमिळनाडूच्या रसीपूरम येथे एका 45 वर्षीय महिलेनं घराची साफ सफाई करताना एक अशी चूक केली की, त्याचा विचारही तुम्ही करू शकणार. दैनंदिन जीवनात घराची साफ सफाई करताना पेपराची रद्दी तुम्ही विकत असता, पण रद्दीत कधी 5 लाखांचे दागिने दिल्याचे तुम्ही ऐकले आहे का? असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.
तमिळनाडूच्या रसीपूरच्या विग्नेश नगरमध्ये राहणाऱ्या कलादेवी यांनी साफ सफाई करत असताना रद्दीवाल्याला चक्क 5 लाखांचे दागिने दिले. मात्र हा रद्दीवाला इमानदार असल्यामुळे त्यानी या महिलेला घरी जाऊन दागिने परत दिले. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रद्दीवाला निघून गेला तेव्हा महिलेच्या लक्षात आले की रद्दीत 5 लाख रुपयांचे दागिने होते. यात मंगळसुत्र, सोन्याच्या बांगड्या आणि दोन डायमंडच्या अंगठ्या यांचा समावेश होता.
कलादेवी यांनी प्रयत्न केल्यानंतरही रद्दीवाल्याला शोधण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर रसीपूरमच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पाहिले. यानंतर पोलिसांनी रद्दीवाल्याचा शोधही घेतला. या रद्दीवाल्याचे नाव होते सेल्वराज. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रद्दीवाल्याने मान्य केले की कलादेवी यांच्या घरून सोन्याचे दागिने मिळाले होते.
पोलिसांनी कलादेवी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी, चोरीच्या भितीनं घरातील सर्व दागिने पेपरमध्ये लपवून ठेवले होते. त्यामुळं आपल्या चुकीनं हे सगळे घडले असल्याचेही कलादेवी यांनी मान्य केले. दरम्यान पोलिसांनी रद्दीवाल्याचा शोध लावल्यानंतर त्याने दागिने शोधण्यास सुरुवात केली आणि काही तासांत दागिने परतही दिले. सेल्वराज यांच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन कलादेवी यांनी त्याला 10 हजारांचे बक्षिसही दिले.
0 comments:
Post a Comment
Please add comment