संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिवेसेनेला संसदेत विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्षावर चांगलीच नाराज झाला आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणे हा निव्वळ योगायोग नसून ते कौर्य आहे, असे म्हणत शिवसेना हा एनडीएचा एक संस्थापक पक्ष असून, कुणाच्या सहीने शिवसेनेला एनडीतून बाहेर काढले, असा थेट सवाल शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. शिवसेना हा संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) जाणार नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना हा एनडीएचा एक संस्थापक पक्ष आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृ्ष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडीस अशा ज्येष्ठ नेत्यांनी एनडीए स्थापन केली. जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे निमंत्रक होते. आता कोण नेते राहिले आहेत,असे सांगत जेव्हा एनडीए स्थापन झाली तेव्हा हे गोधडीत होते, असा टोला राऊत यांनी भारतीय जनता पक्षातील विरोधकांना लगावाला आहे. आता टिवटिव करणाऱ्यांचा एनडीएशी काहीही संबंध नाही. शिरोमणी आकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. शिवसेनेला एनडीएबाहेर काढताना बादल यांना विचारले होते का?, इतरही अनेक घटक पक्ष आहेत, या सर्व घटक पक्षांना विचारले का?, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

0 comments:
Post a Comment
Please add comment