स्व. गीता माळी दूर्घटनेच्या निमित्ताने..

 नाशिकच्या निष्णात गायीका स्व. गीता माळी यांचं अपघाती निधन झाल्याच्या एकंदरीत सगळ्या बातम्या आणि त्या अपघाताचे फोटो पहाताना त्यांची कार ही लक्झरी सेगमेंट मधली होती हे स्पष्ट दिसतंय.
अशा कार्सना हल्ली दोन चार सहा अशा एअरबॅग्ज असतात मॉडेलनुसार ज्या गाडी धडकल्यावर उघडतात आणि आतील माणसं सुरक्षित रहातात जीवीत हानी न होता.
   *मग या केस मधे असं का झाले नाही ? एअर बॅग्ज का उघडल्या नाहीत ?*
   याचं मुख्य कारण म्हणजे गाडी चालवणारा आणि त्याशेजारी बसणाऱ्या माणसाचा कंटाळाच असु शकतो
  हल्लीच्या नवीन कार्स मधे एअर बॅग्ज जरी असल्या तरी त्या जोपर्यंत सीटबेल्ट लावले जात नाहीत तोपर्यत   कार्यरत होत नाहीत अशी योजना असते. गाडी धडकताना जर सीटबेल्टचे हुक त्या स्लॉट मधे नसतील तर     एअर बॅग्ज उघडत नाहीत.
  अनेकदा गाडीची डिलिव्हरी घेताना हे सांगितलं जातं पण आपण सीटबेल्ट न लावल्यानं काय होतं ?अशा बेफिकिरीनं वागुन असे दुर्दैवी प्रसंग ओढावुन घेतो.

दुसरं असं की जरी एअर बॅग आणि सीटबेल्ट याचा संबंध नसणारी गाडी असेल तरी ही गाडी धडकल्यावर तुम्ही इकडे तिकडे फेकले जाण्याची शक्यता सीटबेल्ट लावलेला असताना शंभर टक्के नसते. आणि प्राणहानी टळु शकते.
  सीटबेल्ट लावणं हे लाजिरवाणं काम नाहीए. तुम्हाला चार किमी जायचंय की चारशे याचा विचार न करता गाडीत बसल्याक्षणी  सीटबेल्ट लावुन मगच गाडी सुरु करण्याची सवय लावा. पोलिस दंड करतो म्हणुन नको तर आपल्याच जीवाची काळजी म्हणुन करा.
  टु व्हिलर चालवताना हेल्मेट आणि फोर व्हिलर मधे सीटबेल्ट हे ९० ते ९५% केसेसमधे प्राणांतिक इजेपासुन वाचवु शकतात.
   *अर्थात हे लावलं म्हणजे जीव वाचेलच असं नाही पण छत्री पाऊस थांबवु शकत नसली तरी पण काही           प्रमाणात आपल्याला पावसापासुन वाचवु शकते तसाच हा प्रकार आहे.*

तिसरी गोष्ट म्हणजे या नवीन गाड्यांचा वेग. पॉवरफुल इंजीनमुळे वेग भरपुर घेता येतो पण आपले रस्ते आणि ट्रॅफिक त्या लायकीचं आहेत का ?. गाडी कंट्रोल होत नाही बऱ्याचदा. मशीन आहे ते शेवटी त्याच्याशी खेळ नको.
  तेंव्हा आज, आत्तापासून मनाशी खुणगाठ बांधा ...
*सीटबेल्ट आणि हेल्मेट आणि योग्य वेग या शिवाय वाहन  चालवायचं नाही.*
*अगदी गाडीतल्या प्रत्येकानं हे पाळायचं फक्त ड्रायव्हरनं नाही.*
ता.क. मी स्वतः गाडी चालवायला घेतली की गाडीतल्या प्रत्येकाला सीटबेल्ट लावायला लावतो.
*सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा...*
🌿




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment