एक बाण चार शिकार


शरद पवारांचा शिवसेनाविषयावर युटर्न पाहता एक अंदाज असा होउ शकतो २०१४ साली पवारांनी ज्या पद्धतीने भाजपला बाहेरून पाठींबा जाहीर केला होता त्या पद्धतीने २०१९ च्या या सत्ता स्थापनेमध्ये भाजप राष्ट्रवादी एकत्र येवू शकतात अशा चर्चेला उधान आले आहे, त्याला कारण म्हणजे पंतप्रधान नरेद्र मोदींनी आज केलेली प्रशंसा.
आता सविस्तर बघायच म्हंटल तर भाजपचे १०५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यांचे संख्याबळ १५९ होते, शिवाय भाजपला लहान पक्ष व अपक्ष अशा १४ आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ १७३ होते. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते.


राष्ट्रवादीचे ५४ सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात २३४ सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला ११७ आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे ११९ आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीने राष्ट्रवादीने २0१४ साली भाजपला मदत दिली होती.
आता सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद व १५ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, शिवाय केंद्रात एकवा दोन मंत्रिपदे दिली जातील. भाजपला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडून भाजपसोबत जाईल, अशीही चर्चा आहे.
पवार साहेबांच्या उतरत्या वयानुसार त्याना महाराष्ट्रासोबतच केन्द्रातही सत्तेत बसण्याचे वेध लागले आहेत.एकीकडे महाराष्ट्र हातात घ्यायचा व केन्द्रातले एखादे मंत्रीपद मागुन सुप्रिया सुळेंची वर्णी लावायची असा कॉंबो प्लान आखत असल्याची चर्चा आहे.

सर्व मित्र पक्षनिष्ठा,तत्व,पक्ष वैचारिकता बाजुला ठेवुन मुलीच्या भविष्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला काय कलाटनी देतात त्याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.  शिवसेनेला सत्तेपासुन दुर ठेवून त्यांच्याही अस्तीत्ववर घाला घालयचा ,कॉंग्रेसला आॉक्सिजन वर ठेवायचे .
महाराष्ट्रात व केन्द्रात सत्तेत बसायचे . एक बाण चार शिकार असे पवारांचे चतुसुत्री राजकारण!!!

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

disawar satta king