सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाईल बंद, अजित पवारांना दिलासा : भाजपची मोठी खेळी




मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली असतानाच, देशभरात गाजलेल्या ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाईल बंद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांची उघड चौकशीची फाईल बंद करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाद्वारे  अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना (एसीबी) याबाबत कळवले आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची फाईल बंद करण्याबाबतच्या अंतिम चौकशी अहवालाचे अवलोकन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकांनी केले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास सरकारने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.
एसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, बंद करण्यात आलेली प्रकरणे ही सशर्त होती. या प्रकरणांची अधिक माहिती समोर आल्यास किंवा न्यायालयानं पुढील चौकशीचे आदेश दिल्यास चौकशीची फाईल पुन्हा उघडली जाऊ शकते. ज्या प्रकरणांची चौकशी बंद केली आहे, त्या प्रकरणांमध्ये अजित पवार यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांनी सांगितलं की, 'ज्या प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आली आहे, त्या प्रकरणांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंध नाही.'

दुसरीकडे, सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची फाईल बंद केल्यावरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजप आणि अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या अध्यायामागील सत्य अखेर उजेडात आलं आहे. बेकायदा सरकारकडून एसीबीला सर्व प्रकरणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मोदी है तो मुमकिन है!,' अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king