उत्तेजक द्रव्य घेतल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटच्या मैदानातून झोकात पुनरागमन केले. रविवारी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या पृथ्वीने आसामविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याला नुकतेच मुंबई संघाच्या १५ सदस्यीय संघात सहभागी करण्यात आले होते.
पृथ्वी शॉने या सामन्यात ३९ चेंडूत ६९ धावा केल्या. पृथ्वीने आदित्य तारेच्या साथीने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८२ चेंडूत १३८ धावांची भागीदारी केली. तारेने ४८ चेंडूत ८२ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात मुंबईने ५ बाद २०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आसामचा संघ ८ गड्याच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात अवघ्या १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला.
0 comments:
Post a Comment
Please add comment