व्हॉट्सअप स्टेटस’वर पाळत ठेवून दरोडा

 कोलकात्याहून सोने घेऊन आलेल्या सराफ व्यावसायिकाला दौंड येथे कारमध्ये बसवून दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. या टोळीडून तीन कोटी ७० लाख किमतीचे नऊ किलो सहाशे ग्रॅम सोने आणि कार जप्त करण्यात आली आहे. 'व्हॉट्सअॅप' स्टेटसच्या मदतीने व्यावसायिकावर पाळत ठेवणाऱ्या कामगारानेच आरोपींसोबत गुन्ह्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. 


गणेश दगडू पवार (वय २७), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय २०), मोहसीन अहमद खान मुलाणी (वय २५), प्रथमेश विजय भांबुरे (वय २६, रा. महुत, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विजय दगडू पवार हा आरोपी फरारी झाला, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. या वेळी वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते. गुन्हा उघडकीला आणणाऱ्या पथकाला ३५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. 


सांगोला तालुक्यातील कठवलीचे सराफ व्यावसायिक अप्पा श्रीराम कदम कोलकात्यातून सोने खरेदी करतात. रेल्वेने कोलकात्याहून दौंड येथे उतरून कदम गावी जातात. सहा नोव्हेंबरला ते सकाळी नेहमीप्रमाणे हावडा एक्सप्रेसने दौंडला उतरून गावी निघाले. स्टेशनच्या बाहेर येताच आरोपींनी त्यांना कारमध्ये बसवून कुरकुंभ, भिगवणमार्गे, बांगरवाडी गावाच्या हद्दीत मारहाण करून चाकूच्या धाकाने मोबाइल काढून घेतला. त्यानंतर कदम यांच्याकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावले आणि पळ काढला. त्यानंतर कदम यांनी गुन्हा दाखल केला. ही घटना समजल्यानंतर घडल्यानंतर आरोपींना अटक करण्याचे आदेश ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले. त्यानुसार सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या पथकाने आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळाचे 'सीसीटीव्ही' फुटेजही तपासले. त्या वेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे समजले. चौकशीदरम्याने कदम यांच्याकडील भांबुरे हा कामगार दोन ते तीन दिवसांपासून कामावर येत नसल्याची माहिती मिळाली. त्याची माहिती घेतल्यानंतर तो दौंड परिसरात येऊन गेल्याचे समजले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. भांबुरे याने कदम यांच्याविषयीची टीप मोहसीनला दिली. त्यानंतर त्याने साथीदारांना सोबत घेऊन गुन्ह्याचा कट रचल्याचे समोर आले. 


'स्टेटस' ठेवणे आले अंगलट 


तक्रारदारांकडे भांबुरे कामाला होता. त्याला कदम कोलकात्यातून सोनेखरेदी करून हावडा एक्स्प्रेसने दौंड येथे उतरतात, हे माहिती होते. कोणतेही ठिकाण सोडताना कदम 'व्हॉट्सअॅप स्टेटस' बदलत होते. एकाएकी कदम यांनी 'गुड बाय कौठाळी' असे स्टेटस ठेवल्याचे आरोपीला दिसले. त्यामुळे कदम सोने आणण्यासाठी गेल्याचे समजले. ते साधारण चार दिवसांत सोने घेऊन परततात. त्यानुसार कट रचून आरोपींनी दरोडा टाकल्याचे उघड झाले. आरोपींनी सोने ताब्यात आल्यानंतर घरातच ते सोने वितळवून छोट्या प्लेट तयार केल्या आणि प्रत्येकी २ किलो सोने वाटून घेतले, अशी माहिती घनवट यांनी दिली. 


चोरी दहा किलोची; तक्रार एक किलोची 


व्यावसायिकाला लुटल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फक्त एक किलो सोने चोरीला गेल्याची तक्रार दिली. मात्र, ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी दहा किलो सोने चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडू नऊ किलो सहाशे ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. अद्याप एका आरोपीचा शोध सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कोर्टामार्फत सोने परत केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. 






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king