"माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून..." - धनंजय मुंडे



राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे.

“माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे तसेच मला ब्लॅकमेल करणारे आहेत” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी स्वत:च या प्रकरणाची वस्तुस्थिती सांगितली आहे.

एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे मी सर्वोतोपरी त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापन करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.

मात्र २०१९ पासून सदर महिला व तिची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता. मोबाईलवरून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे SMSचे पुरावे माझ्याकडे आहेत. दबाव तंत्राचा हा भाग असू शकतो. या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून योग्य चौकशी केली जाईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment