अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा - कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम |
राज्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषि विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. तसेच कोरोनाचा कृषि क्षेत्राला बसत असणाऱ्या फटक्याबाबत बोलताना कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतात व आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवतोय. मात्र, तूर्त कोरोनाच्या परिस्थितीवर मात करणं हे ध्येय आहे. त्यानंतर नुकसानीच्या बाबतीत विचार होईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही. या संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर याबाबतीत बोलणं योग्य होईल, असंही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा मोठा फटका फळबागा आणि रब्बी पिकांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू, डाळींब अशा फळबागांचं मोठं नुकसान झालंय. तर, गहू, हरभरा, मका या पिकांचीही खराबी झालीय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. परभणी, सांगली, लातूर, धुळे, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. सोबतच शेकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही कदम यांनी दिले आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment